सॅनफ्रान्सिस्को मधील मुलीच्या एका चुकीमुळे वडिलांना नोकरी गमवावी लागली आहे. अॅपल कंपनीने एका अभियंत्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. या अभियंत्याच्या लेकीनं आयफोन X चा एक व्हिडिओ कंपनीने प्रसिद्ध करण्यापुर्वीच पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला.
या व्हिडिओत ब्रुक एमिलिया पीटरसन हिने अॅपल कॅम्पसच्या आपल्या ट्रीपचं शूटिंग केलं. तिचे वडील तिथेच काम करत होते. त्यांच्या हातात आयफोन X होता. त्या व्हिडिओत या फोनचं फुटेजही दिसत होतं. त्यावर अॅपलच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेला विशेष QR कोड होता. व्हिडिओत एमिलिया आयफोनवर काम करताना दिसत आहे. फोनच्या होमस्क्रीन आणि नोटिफिकेशन स्क्रीनचा क्लोज-अपदेखील होता.पीटरसन यांनी दावा केलाय की त्यांना या व्हिडिओमुळे आपली नोकरी गमवावी लागली. अॅपल कॅम्पसच्या आत व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे. या नियमाचं उल्लंघन केल्याने ही कारवाई झाली आहे. त्यांना हा व्हिडिओ युट्युबवरून हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, पण तोपर्यंत तो व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews